HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर आयकर विभागाने मारला छापा

कोल्हापूर | कागलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आज (२५ जुलै) सकाळी आयकर विभागाच्या पथकाने धाड टाकली आहे. मुश्रीम यांच्या कागल येथील घरी तब्बल पंधरा जणांचे पथकांनी घरातील विविध कागदपत्रांची माहिती घेतली आहे. आयकर विभागाने मुश्रीफ यांच्या खासगी साखर कारखाना, त्यांच्या पुण्यातील मुलाचे घर व टाकाळा परिसरात राहणारे साडू यांच्याही घरावर आयकर विभागाने छापा टाकल्याने खळबळ उडाली.

मागच्या चार दिवसांपूर्वी भाजपा प्रदेध्याध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ यांना भाजपामध्ये येण्याची जाहीर समारंभात ऑफर दिली होती. पण त्यांनी त्यास नकार देऊन शरद पवार हेच माझे देव असल्याचे स्पष्टपणे सांगितले. महापालिकेतील टीडीआर व्यवहार, साखर कारखान्याचा व्यवहार तसेच जिल्हा बँकेत पडून असलेली ३०० कोटी रुपये जुन्या नोटा यावरून आयकर विभाग तपासणी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ओबीसींवर सर्वपक्षीय बैठक संपली’, देवेंद्र फडणवीस म्हणाले…..

News Desk

स्वबळाचा आग्रह शेवटपर्यंत टिकेल असं मला वाटत नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

News Desk

लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता, आरोग्यमंत्र्यांनी दिले संकेत 

News Desk