HW News Marathi
महाराष्ट्र

BMC शिवसेनेकडे आहे, ही हुकूमशाही चांगली नाही – नवनीत राणा

मुंबई  | कंगना राणावतच्या मुंबईतील कार्यालयाचा काही भाग अनधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. यावर उत्तर न दिल्यास कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला होता. कंगनाने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या घटनेवर सर्वच स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. आता खासदार नवनीत कौर राणा यांनी ट्विट करून ‘ही हुकुमशाही चांगली नाही’ म्हटलं आहे. ‘राज्य सरकार कंगनाचं ऑफिस तोडत आहेत. सत्तेच्या मोहात ताकदीचा असा गैरवापर केला जातोय. BMC शिवसेनेकडे आहे. ही हुकूमशाही चांगली नाही,’ असं ट्विट नवनीत कौर राणा यांनी केले आहे.

 

या विषयावर कुणीच बोलू नका, मातोश्रीचे पक्षनेते आणि नवनियुक्त प्रवक्त्यांना सक्त आदेश देण्यात आले आहेत.  कंगनाच्या कार्यालयाच्या पाडकामावर न बोलण्याचा पक्षादेश देण्यात आले आहे. मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपने केले आहे. दरम्यान, कंगना राणावत हिचे विमान मुंबई विमानतळावर दाखल झाले आहे. आणि रीपाई तिला समर्थन करत आहे तर शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ठरल्याप्रमाणे झालं असतं तर मी फोटोग्राफी करुन तुम्हाला प्रदर्शनाला बोलावलं असतं’ फडणवीसांना प्रतिउत्तर

News Desk

मुंबई आणि पुणे दोन्ही शहरात ‘सन्मान मोर्चा’ला परवानगी नसताना सुद्धा मोर्चा काढला

News Desk

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावरच लढणार!

News Desk