HW News Marathi
Covid-19

नवनीत राणा यांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्यानंतर मुंबईत हलवले

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्यास त्यांना मुंबईत उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर पुढील उपचार केले जाणार आहेत.६ ऑगस्टला त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर काही दिवस त्यांच्यासह घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्येत खालावल्याने ११ ऑगस्टला त्यांना नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या घरातील १० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांत त्यांच्या ४ वर्षाच्या मुलीला आणि ७ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. आमदार रवी राणा यांचे वडील यांचा २ ऑगस्टला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांच्या सासू सासऱ्यांवर नारपूरच्या वॉकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य आणि कार्यकर्ते मिळून ५०-६० जणांच्या टेस्ट करण्यात आल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत आजपासून निर्बंध शिथील दुकाने खुली करण्यासाठी सम-विषम फॉर्म्युला

News Desk

देशात ६,६५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

औरंगाबाद जिल्ह्यात १, ११७ कोरोनाबाधितांची नोंद

News Desk