HW News Marathi
महाराष्ट्र

नवनीत राणा यांनी घेतला एक अनोखा निर्णय!

अमरावती | कोरोनाच्या या कठीण काळात सर्वच स्तरातून नागरिकांना मोठा धक्का बसला आहे. अशात आता त्यांच्या मदतीला राजकीय नेते धावून येत असल्याचं दिसत आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या त्यांच्या वेगवेगळ्या उपक्रमातून नेहमीच चर्चेत असतात. आताही त्यांनी असाच एक मोलाचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्याचा पगार शहीद जवानाच्या कुटुंबाला आणि त्यानंतरचा हा पगार शेतकऱ्यांना देणार असल्याची घोषणा नवनीत राणा यांनी केली आहे.

अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा इथल्या जवान कैलास दहीकर यांचा कर्तव्यावर असताना कुल्लू मनालीत इथं मृत्यू झाला होता. त्यामुळे अकाली जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थिती अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपला खासदारकीचा पगार शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल २ लाख ५१ हजार रुपयांचा पगार हा नवनीत राणा यांनी शहीद जवानाच्या कुटुंबाला दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिक कैलास यांच्या आई वडील आणि पत्नीला हा धनादेश सुपूर्द करण्यात आला. अमरावतीत एका कार्यक्रमात हा धनादेश देण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केडीएमसी महापालिकेत नगरसेवक भिडले

News Desk

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल – देवेंद्र फडणवीस

News Desk

… नाहीतर १०५ आमदार घेऊन तुम्ही घरी का बसला असता ?, रुपाली चाकणकरांनी सुनावले

News Desk