HW News Marathi
देश / विदेश

शिवसैनिकांवर कारवाई करा, महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, नवनीत राणांची पत्रातून मागणी

नवी दिल्ली | शिवसैनिकांकडून माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण करण्यात आली होती. या मुद्द्याला आता वळण येत आहे. हा मुद्दा खासदार नवनीत राणा यांनी चांगलाच पुढे आणला आहे. यावरून त्यांनी शिवसेनेवर टीका केली होतीच. आता त्यांनी आज (१४ सप्टेंबर) दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी मदन शर्मा यांना मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच महाराष्ट्रातील शिवसेनेची हुकूमशाही थांबवा, अशी विनंतीही त्यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.

सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शुक्रवारी ८ ते १० शिवसेना कार्यकर्त्यांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. विरोधी पक्ष असलेल्या भाजपने हा मुद्दा उचलून धरला होता.

मात्र, यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मदन शर्मा यांच्यावरील हल्ला म्हणजे शिवसैनिकांची उत्स्फुर्त प्रतिक्रिया असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे नवनीत राणा चांगल्याच संतापल्या. त्यांनी संजय राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध केला होता. तसेच राऊतांप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही शिवसैनिकांच्या गुंडगिरीला समर्थन आहे का, असा सवाल नवनीत राणा यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान आज (१४ सप्टेंबर) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून माजी नौदल अधिकारी मारहाण प्रकरण आणि भाजपची भूमिका यावर सडकून टीका करण्यात आली आहे. लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या माजी नौदल अधिकाऱ्याला स्वतः संरक्षणमंत्री फोन करुन धीर देत असतील तर राज्यपाल, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपराष्ट्रपती, विद्यमान लष्करप्रमुख, नौदलप्रमुखांची बदनामी केली तर चिंता करु नका, असा खोचक सल्ला अग्रलेखात केंद्र सरकारला देण्यात आला आहे. तसेच मारहाणीसाठी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या माजी अधिकाऱ्याने चीन सीमेवर २० जवानांच्या हत्येस जबाबदार धरुन राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला हवी होती, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यसभेच्या उपसभापती पदी एनडीएचे हरिवंश सिंह विजयी

swarit

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सुप्रीम कोर्टात आज होणार सुनावणी

swarit

आयसीस कडून अमेरीकेत दशहतवादी हल्ला 

News Desk