HW News Marathi
देश / विदेश

आयसीस कडून अमेरीकेत दशहतवादी हल्ला 

न्यूयॉर्क – अमेरिकेच्या मॅनहॅटन येथे एका भरधाव ट्रकने अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत जवळपास ८ जणांचा मृत्यू तर १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. न्यूयॉर्क पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ट्रक चालक दहशतवादी असल्याचे सांगण्यात येत आहे.

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने ट्रक चालकाला अटक केली. हडसन नदीच्या किनाऱ्यालगत मोटारसायकल स्वारांसाठी राखीव असलेल्या रस्त्यावर ट्रक चालवून दहशतवाद्याने अनेकांना चिरडलं. न्यूयॉर्क पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये घटनेची माहिती दिली आहे. या हल्ल्यामागे आयसिसचा हात असल्याचीही माहिती समोर आलीय. या घटनेने संपूर्ण अमेरिका हादरली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घटना दुर्देवी असल्याचं म्हटलंय. शिवाय ‘आता झाले तेवढे पुरे झालं, आयसिसला अमेरिकेत पुन्हा येऊ देणार नाही’, असं ट्विट ट्रम्प यांनी केलं आहे. त्याच बरोबर घटना अतिशय दुर्देवी असून विकृत मानसिकतेतून झालेला हा भ्याड हल्ला असल्याचही ट्रम्प म्हणाले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

५० लाखांचा विमा उतरवून बहिणीची हत्या

News Desk

आम्हाला विश्वासात न घेता शासन निर्णय काढला ! राज्य सरकारवर काँग्रेस प्रचंड नाराज

News Desk

CBSE बोर्डाची १०वीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच होणार  

News Desk