मुंबई। मुंबईत साकीनाका भागात घडलेल्या प्रकाराबद्दल महाराष्ट्रात खबल माजली आहे. अनेक लोकं व राजकारणी संताप व्यक्त करत आहेत. या घटनेवर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी होत आहे. ही घटना अत्यंत दुर्देवी आहे. या घटनेतील आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
सरकार लवकरात लवकर चार्जशीट दाखल करेल
नवाब मलिक यांनी सरकार लवकरात लवकर चार्जशीट दाखल करेल अशी हमी दिली आहे. या महिलेसोबत दुष्कर्म करण्यात आला होता. त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. पण आरोपीला अटक केल्यानंतर निश्चित रुपाने सरकार लवकरात लवकर चार्जशीट दाखल करेल. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवू, तसा आग्रह गृहमंत्र्यांना धरू. लवकरात लवकर कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या शिक्षेने आरोपींच्या मनात भीती निर्माण झाली पाहिजे अशी शिक्षा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं मलिक यांनी सांगितलं आहे.
We will make sure that the charge-sheet is filed within a given frame of time & the case is fast-tracked to bring the accused to justice: Maharashtra Minister Nawab Malik on Mumbai rape case pic.twitter.com/nj9jD5AwcT
— ANI (@ANI) September 11, 2021
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी पोलिस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीचा फोन आला असून खैरानी रोडवर एक व्यक्ती महिलेला मारहाण करत असल्याची माहिती दिली. पोलिस तिथे पोहोचली आणि रक्ताच्या थारोळ्यात ती महिला जखमी आढळली. तिला तात्काळ घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात भरती करण्यात आली, पोलिसांच्या प्राथमिक तपासात महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात रॉड घुसवलेला आढळून आला.
काय म्हणाले गृहमंत्री
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खंत व्यक्त केली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी साकीनाका बलात्कार प्रकरण अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तिचा जबाब झाल्यानंतर खरी परिस्थिती समोर येईल. जी काही कठोर शिक्षा आहे ती केली जाईलच, पोलीस खात्याला मी यासंदर्भात कालच सूचना दिलेल्या आहेत. यामध्ये तपास सुरु आहेय. आणखी कोणी आरोपी आहेत का त्याचाही तपास घेण्याच्या सूचना करण्यात आल्यात. या घटनेचा वेळोवेळी अहवाल मला द्या अशा सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत, असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते. मात्र आता पीडित महिलेचा मृत्यू झाल्याने प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.