HW News Marathi
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंचा नाशकात अचानक सिटी बसमधून प्रवास..!


नाशिक। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज सकाळी अचानकपणे नाशिक शहरातील सिटी बसमधून प्रवास करत सर्वानाच आश्चर्यचकित केले. हा प्रवास त्यांनी तिकीट काढून केला हे विशेष.. तर पंकजा मुंडे गेल्या दोन दिवसांपासून नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यांच्या उपस्थितीत शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज सकाळी माऊली नगरातील एका गृह प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपवुन त्या बाहेर आल्या आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या सिटी बस मध्ये बसल्या, या प्रसंगाने कार्यकर्ते व प्रवाशी आश्चर्यचकित झाले.

पंकजा मुंडेंनी महापौरांचे विशेष कौतुक केले

त्यांच्या समवेत आ. जयकुमार रावल, आ. सीमाताई हिरे, महापौर सतीश कुलकर्णी होते. बसमधील वाहकांकडून तिकिट काढून त्यांनी सावरकर नगर ते अशोकनगर असा प्रवास केला. ही बस सेवा अल्पावधीतच अतिशय उपयुक्त ठरली असून महापालिकेने सुमारे 250 बस यासाठी रस्त्यावर उतरवल्या आहेत. या सेवेच्या उत्कृष्ट सोयीबद्दल केंद्र सरकारने नुकताच पुरस्कार देऊन महापालिकेचा गौरव केला आहे. या सेवेबद्दल पंकजा मुंडेंनी महापौरांचे विशेष कौतुक केले.

दौरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला

भाजप नेत्या पंकजा मुंडे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्यांचा हा दौरा वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. काल सकाळी त्यांनी ज्येष्ठ तसेच मार्गदर्शक म्हणून छगन भुजबळ यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यानंतर काही वेळाने त्या भुजबळांचे कट्टर विरोधक शिवसेनेचे आमदार सुहार कांदे यांच्या निवासस्थानी पोहचल्या. त्यामुळे त्यांनी आमदार कांदेंशी काय गप्पा मारल्या असतील हा चर्चेचा विषय ठरला आहे.

पंकजा मुंडे यांनी भुजबळांचे कौतुक केले

दिवाळीच्या पूर्वसंध्येला सुरु झालेल्या या दौऱ्यात त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली. प्रदिर्घ कालावधीनंतर त्या दौऱ्यावर आल्याने विविध कार्यकर्ते, समर्थक, सामाजिक व राजकीय कार्यर्त्यांनी त्यांची भेट घेतली. सकाळी आमदार देवयानी फरांदे यांच्या पुढाकाराने झालेल्या संदर्भ सेवा रुग्णालयाच्या इमारतीच्या भुमीपूजनाच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी भुजबळांचे कौतुक केले. (कै) गोपीनाथ मुंडे यांचे सहकारी व ओबीसी नेते म्हणून विविध संदर्भांना त्यांनी उजाळा दिला. श्री. भुजबळ यांनी देखील मुंडे यांचा सन्मान केला. त्यामुळे या राजकीय देहबोली व संवादाची चर्चा तर होणारच होती, तशी ती झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाथरस प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे द्या, शिवसेनेची मागणी

News Desk

गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आज राज्यभर आंदोलन करणार – रूपाली चाकणकर

News Desk

काँग्रेस ३० जानेवारीला नागपूर पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’  पुरस्कार देणार!

News Desk