HW News Marathi
महाराष्ट्र

रेमडेसिविर साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात, नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

मुंबई | राज्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्याची आरोग्य यंत्रणा खालावत चालली आहे. यातच रेमडेसिविरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केला होता. इतकंच नाही तर गुजरातमध्ये भाजपच्या कार्यलयात रेमडेसिविरचा साठाही मिळाला होता. यावरुनमहाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. रेमडेसिवीर महाराष्ट्राला पुरवाल तर परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने औषध कंपन्यांना दिल्याचा दावा नवाब मलिकांनी केला होता.

या दाव्यानंतर आता नवाब मलिकांनी आणखी एक दावा केला आहे. ज्यात भाजपच्या माजी आमदाराकडे रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध असल्याचं ते म्हणाले आहेत. भाजपच्या माध्यमातून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात रेमडेसिवीरचा साठा त्यांच्या गोडाऊनमध्ये उपलब्ध झाला होता असा आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. आज (२० एप्रिल) पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले नवाब मलिक?

भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुप चालवणारे मालक यांनी नंदुरबार येथील हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीरचा साठा जमा करून ठेवला होता. त्यांनी स्वतः फोटो जाहीर केले आहेत. त्यामध्ये ग्रुप फार्माला ओन्ली फॉर एक्स्पोर्ट हे औषधांवर लिहिलेले असताना ८ एप्रिलला चौधरी बांधवाकडून रेमडेसिवीर रांगा लावून वाटप करण्यात आले. त्यानंतर दोन दिवस लॉकडाऊन असल्याने वाटप करण्यात येणार नाही असे सांगून १२ एप्रिलला पुन्हा वाटप करण्यात आले.

जवळपास ७०० – ८०० रेमडेसिविरच्या वायल्स वाटण्यात आल्या होत्या. परंतु आमच्या माहितीनुसार २० हजारपेक्षा जास्त रेमडेसिवीर ब्रुक फार्माने आणून ठेवली होती. त्यापैकी ७०० – ८०० इंजेक्शन नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्हयात काळाबाजाराने वाटप करण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

हिरा ग्रुपचे शिरीष चौधरी यांच्याकडे एफडीएचा परवाना होता का? महाराष्ट्र एफडीएने परवाना दिला होता का? किंवा दमणच्या एफडीएने परवाना दिला होता का? असा सवालही नवाब मलिक यांनी यावेळी केला आहे. एखादा नेता जो आमदार राहिलेला आहे. तो बेकायदेशीरपणे २० हजाराचा साठा ठेवतोय, विकतोय, वाटप करतोय असं मलिकांनी सांगितले आहे.

नंतर तोच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना घेऊन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना परवानगी मिळवून द्या यासाठी भेटला होता. १७ तारखेपर्यंत परवानगी नव्हती. त्या काळात जळगावात धंदा सुरू होता. त्याचवेळी आमचे आमदार अनिल पाटील यांनी मंत्र्यांकडे तक्रार करुन कडक कारवाई करण्याची मागणी केल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

ब्रुक कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वकिलपत्र घेऊन गेले होते. त्यानंतर माझ्यावर आरोप करण्यास सुरुवात झाली. माझ्या जावयाचा विषय समोर आणला जात आहे. जावयाला अटक झाल्यामुळे नवाब मलिक केंद्राच्या विरोधात आणि अमित शहा यांच्या विरोधात बोलत आहेत. परंतु काही दिवसांपूर्वी मी स्पष्ट सांगितले होते की, कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही. जो काही निर्णय न्यायालयात होईल तो होईल. जे सत्य आणि असत्य आहे ते बाहेर येईलच असे नवाब मलिक म्हणाले आहेत.

कोरोनाच्या कठीण काळात औषधांचा काळाबाजार करत आहेत त्यांना वाचवण्याचा धंदा भाजपाने सुरू केला आहे. हे राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल. रेमडेसिवीर लोकांना भेटेल. केंद्र सरकारकडून जे विषय दुर्लक्षित होतायत. त्याकडे लक्ष द्या असे सांगितल्यावर व विषय समोर आल्यावर केंद्र सरकार जागे झाले आहे असा टोला नवाब मलिक लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जे भाजपच्या पोटात ते कंगणाच्या मुखात! – बाळासाहेब थोरात

News Desk

“मुख्यमंत्र्यांचा दौरा म्हणजे केवळ ‘दर्शनाचा’ कार्यक्रम”, दरेकरांचं टीकास्त्र

News Desk

केंद्राच्या कृषी कायद्याबाबत आज मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वाची बैठक होणार

News Desk