HW News Marathi
महाराष्ट्र

“ठाकरे सरकारला अपवित्र युती म्हणणारे अमित शहा ब्रम्हदेव नाहीत”, आव्हाडांनी शहांना सुनावले

ठाणे | सत्तेत असलेले महाविकासआघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचे भाजपकडून म्हटले जात आहे. यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ठाकरे सरकार लवकरच पडणार असल्याचे म्हटले आहे. अमित शहांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे काही ब्रह्मदेव नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्ती यांच्याशी युती केली. तेव्हा तुम्ही कुठल्या पवित्र संबंधात जोडले गेले होता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आज (२० एप्रिल) ठाण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली आहे. “महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी कुंभमेळ्यात तुमच्याप्रमाणे अंघोळ करून कोरोनाचा संसर्ग फैलावण्यास मदत केली नाही. आता केवळ कुंभमेळ्यात अंघोळ न केल्यामुळे आम्हाला अपवित्र ठरवले जात असेल तर आम्हाला ते चालेल”, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.

“आपण बोलण्यापेक्षा महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा जो जबरदस्तीने कमी केला आहे तो जरा व्यवस्थित करा. तसेच महाराष्ट्र्राला रेमडेसिवीर देण्याबाबत जे राजकारण केले गेले आहे ते जरा बंद करा. कमी लोकसंख्या असणाऱ्या गुजरातला व्हेंटिलेटर दिले. आम्हाला दुपटीने देऊ नका. मात्र गरज आहे तेवढी तरी द्या. तेव्हा महाराष्ट्राचा गळा दाबण्याचा काम करून महाविकास आघाडीला अपवित्र म्हणण्यापेक्षा इथली माणसे मारणार नाही, याची काळजी घ्या”, अशा शब्दात आव्हाड यांनी सुनावले आहे.

काय म्हणाले होते अमित शहा?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाच्या विखारी प्रचाराला महाराष्ट्र काँग्रेसचे २ लाख ‘गांधीदूत’ चोख उत्तर देणार !  

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने KEM रुग्णालयात दाखल

Aprna

…म्हणून राज ठाकरे मास्क घालत नसतील! – रामदास आठवले

News Desk