HW News Marathi
क्राइम

“जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी IRSची नोकरी मिळवली” ?

मुंबई |आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात पंच प्रभाकर साईलने केलेल्या गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे. प्रभाकर साईलने दिलेल्या मुलाखतीमुळे समीर वानखेडे यांच्या विश्वासहर्तेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. समीर वानखडे यांची NCB कडून विभागीय चौकशी होणार आहे. दुसरीकडे या समीर वानखेडेंवर याआधीच आरोपांच्या फैरी झाडणाऱ्या नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर आता आणखी एक आरोप केला आहे. मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर याआधीच भरपूर आरोप केले आहेत. त्यानंतर त्यांनी आता थेट त्यांच्या या नोकरीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आणखी एक गंभीर आरोप केला आहे.

आता त्यांच्याबाबतचं सत्य आपोआपच बाहेर येतंय…

त्यांनी म्हटलंय की, जातीचा बोगस दाखला काढून वानखेडेंनी आयएसआरची नोकरी मिळवली आहे. खोटा दाखला काढून वानखेडेंनी एका मागासवर्गीय व्यक्तीची संधी हिरावली आहे. मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर याआधीच भरपूर आरोप केले आहेत. नवाब मलिकांनी म्हटलंय की, मी हेतुपुरस्सर आरोप करतोय, असं भाजपकडून वर्तवण्यात आलं. जावयावर कारवाई केल्यामुळे मी सुडाने आरोप करतोय, असं सांगण्यात आलं मात्र, आता त्यांच्याबाबतचं सत्य आपोआपच बाहेर येतंय. आणखी सत्य बाहेर येणं बाकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोध असताना मुलीचे लग्न लावले, सहा महिन्यांनी केला जावयचा खून

News Desk

तीन मुलींसह गर्भवतीने घेतले जाळून

News Desk

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यात पोलिसांना यश

Chetan Kirdat