HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही – नवाब मलिक

मुंबई | देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला असून या आक्षेपाला नवाब मलिक यांनी आपल्या भाषेत उत्तर दिले आहे.

शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र सोलापूर व इतर जिल्हयात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे.

दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. शिवाय मंदिरामध्ये सीनही केले आहेत याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केले आहे असे होत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

Related posts

लॉकडाऊनच्या गोंधळात देश गटंगळ्या खात आहे, सामनातून केंद्रावर टीका

News Desk

कोविड संदर्भात राज्यात आतापर्यंत ६० हजार गुन्हे दाखल

News Desk

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिवादन

News Desk