HW News Marathi
महाराष्ट्र

देशात रेमडेसिवीरचा तुटवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय!

मुंबई | देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्वीट करुन भाजपच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपाच्या राजकारणावर सवाल उपस्थित केला आहे.

कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्रसरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू असतानाच गुजरातमधील सुरत येथील भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे. हे ट्वीट करत नवाब मलिक यांनी कोरोना काळातील भाजपाचे राजकारण देशातील जनतेसमोर आणले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परप्रांतीय मासे विक्रेत्यांना मनसेचा दणका!

News Desk

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, पटोलेंचा मोठा

News Desk

मुंबईत तुमच्या आहेत त्या जागा वाचवून दाखवा !भाई जगतापांचं भाजपला चॅलेंज

News Desk