HW News Marathi
महाराष्ट्र

शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या दानवेंचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करा !

मुंबई | देशातील शेतकर्‍यांना खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन हा आरोप करुन शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान आहे असे सांगितले आहे त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

रावसाहेब दानवे हे केंद्रीयमंत्री आहेत त्यामुळे ही सरकारची भूमिका आहे की, रावसाहेब दानवे यांची हे सरकारने स्पष्ट करावे. जर सरकारची भूमिका असेल तर तोमर यांच्यासोबत बैठका का घेतल्या. गृहमंत्री अमित शहा का बैठका घेत आहेत. आणि असं असेल तर सरकारने काय केलं आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

६.८ टक्के विकासदराने १ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था हे दिवास्वप्नच! – नाना पटोले

Aprna

‘केंद्राला वाटत असेल की शेतकरी थकेल तर तो गैरसमज’

News Desk

“शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली”, चंद्रकांत पाटलांचा अनिल परबांना इशारा!

News Desk