HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई। ड्रग्ज प्रकरणात आता नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना सुरु झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून तो फडणवीस सरकारच्या काळात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे.

ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस

मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असेही मलिक म्हणाले.

मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद

मलिकांच्या या आरोपांवर आता भाजप नेते आक्रमक झालेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिकांचा हा आरोप अत्यंत हास्यास्पद असल्याचं म्हटले आहे. ‘ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात एवढे चांगले काम केले, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप केला जातोय. हा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता

दरम्यान, नवाब मलिक यांनी केलेला आरोप फडणवीस यांनी फेटाळून लावला होता. तसेच नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचे पुरावे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपवणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्याला आता नवाब मलिक यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलेय. है तैयार हम असे केवळ तीन शब्दांचे ट्विट केले. त्यामुळे ऐन दिवाळीमध्ये फडणवीस आणि नवाब मलिक यांच्यामध्ये राजकीय जुगलबंदी रंगण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जाणून घ्या…कोण आहेत सचिन अहिर

News Desk

राष्ट्रवादीचे आमदार, खासदार एक महिन्याचं मानधन पुरग्रस्तांना देणार, अजित पवारांची घोषणा

News Desk

शौमिका महाडिकांची गोकुळ दूध संघाच्या चिलिंग सेंटरच्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर!

News Desk