HW News Marathi
देश / विदेश

छत्तीगडमध्ये नक्षलवाद्यांच्या भीषण हल्ल्यात बेपत्ता असलेले १७ जवान शहीद

रायपूर | छत्तीसगडमधील सुकमा भागात गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर शनिवारी (२१ मार्च) नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. सुकमा या नक्षलग्रस्त भागांत चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतच नक्षलवाद्यांनी डीआरजी जवानांवर केलेल्या या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. डीआरजी, विशेष कृती दल आणि कोब्रा हे संयुक्तपणे नक्षलवाद्यांच्याविरुद्ध कारवाई करत होते. या हल्ल्यात तब्बल १७ सुरक्षा जवान बेपत्ता असून १४ जवान जखमी झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, आता बेपत्ता झालेले हे सर्व जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर, या हल्ल्यातील जखमी जवानांना शनिवारी रात्री उशीरा या हेलिकॉप्टरच्या मदतीने रायपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डीआरजी, विशेष कृती दल आणि कोब्रा हे संयुक्तपणे शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांच्याविरुद्ध सुकमा भागात कारवाई करत असताना नक्षलवाद्यांना त्याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर नक्षलवाद्यांना या जवानांना घेरुन त्यांच्यावर हल्ला चढवला. सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांच्या तब्बल तीन तास चाललेल्या या चकमकीत जवानांनी जवळपास ४ ते ५ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. मात्र, या चकमकीत तब्बल १४ सुरक्षा जवान जखमी देखील झाले. इतकेच नव्हे तर एकूण जवानांपैकी १७ जवान हे चक्क बेपत्ता असल्याचे लक्षात आले. जवानांच्या अशा बेपत्ता होण्यामुळे यावेळी चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर ड्रोनच्या मदतीने देखील या बेपत्ता जवानांचा शोध घेण्यात आला. मात्र, आता हे १७ जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे.

सुकमा भागात शनिवारी झालेला हा हल्ला २०२० मधील हा सर्वाधिक मोठा हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. शहीद झालेल्या या १७ पैकी १२ हे डीआरजी जवान होते. या हल्ल्यात सुरक्षा जवानांच्या अशा एकाएकी गायब होण्याच्या खळबळजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर डीजीपी डीएम एवस्थी यांनी शनिवारी (२१ मार्च) रात्री उशिरा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची भेट घेऊन त्यांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना काही सूचना केल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदीने ७ हजार ३०० कोटी व्याजासह पीएनबीला परत करण्याचे न्यायालायचे आदेश

News Desk

काँग्रेसला मोठा धक्का! राहुल गांधींची खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?

Aprna

२०२० या वर्षानं आपल्याला खूप काही दाखवलं आहे तसंच शिकवलं – नरेंद्र मोदी

News Desk