HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

छत्तीसगढमध्ये १ लाखाचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याला कंठस्नान

सुकमा | छत्तीसगडमधील सुकमा येथे मंगळवारी (२३ जुलै) झालेल्या चकमकीत डीआरजी पथक आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत १ नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे. त्याचप्रमाणे या नक्षलवाद्यांकडून शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, डीआरजी पथकाच्या जवानांकडून ज्या नक्षलवाद्याला कंठस्नान घालण्यात आले त्या नक्षलवाद्यावर १ लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते. मडकम हिडमा असे त्या नक्षलवाद्याचे नाव होते.

 

रायपूरपासून जवळपास ५०० किमीच्या अंतरावर असलेल्या बिरभट्टी गावाजवळ डीआरजी पथकाची शोधमोहिम सुरु असताना परिसरात दडून राहिलेल्या नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यावेळी डीआरजीच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एका नक्षलवाद्याचा खात्मा झाला तर बाकीचे नक्षलवादी पळून गेले. त्यामुळे सध्या या परिसरात शोधमोहीम सुरू असल्याची माहिती नक्षलविरोधी मोहीमेचे उप-महानिरीक्षक पी सुंदरराज यांनी दिली आहे.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने डान्स बारवरील बंदी उठवली

News Desk

शरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची !

News Desk

औरंगजेबाला उभ्या हयातीत जमलं नाही ते फडणवीस सरकारने करून दाखवले !

News Desk