HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात १०वीचा निकाल जाहीर, एकूण निकाल ९५.३०% तर, कोकण विभागाने मारली बाजी !

मुंबई | राज्यात दहावीचा निकाल आज (२९ जुलै) जाहीर झाला आहे. राज्यात एकूण निकाल ९५.३० टक्के लागला आहे. कोकण विभागाची निकाल सर्वाधिक लागला आहे. हा निकाल ९८.७७ टक्के इतका लागला आहे. यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. ९६.९१ विद्यार्थीनी आणि ९३.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८,३६० शाळांचा १०० % निकाल लागला आहे तर २८ शाळांचा निकाल ० % लागला आहे.

दरम्यान, औरंगाबाद विभागाची निकाल सर्वात कमी लागला असून तो ९२ टक्के इतका लागला आहे. दुपारी १ वाजता ऑनलाईन निकाल www.mahresult.in या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल ९२.७३ टक्के लागला आहे. तर माघील वर्षापेक्षा १८ टक्क्यांनी निकाल वाढला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर आज जाहीर झाला आहे.

कोकण – 98.77 टक्के

पुणे – 97.34 टक्के

कोल्हापूर – 97.64 टक्के

मुंबई – 96.72 टक्के

अमरावती – 95.14 टक्के

नागपूर – 93.84 टक्के

नाशिक – 93.73 टक्के

लातूर – 93.09 टक्के

औरंगाबाद – 92 टक्के

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘झोटिंग समितीचा अहवाल गायब करण्यामागे राष्ट्रवादी, शिवसेनेचा हात,’अतुल भातखळकरांचा घणाघात

News Desk

उदयनराजे भोसलेंनी उद्घाटन केलेल्या छत्रपती संभाजी महाराज मार्गाचा बॅनर फाडला, साताऱ्यात तणावाचे वातावरण

News Desk

महापुराच्या संकटातून जनतेला बाहेर काढण्यासाठी पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

News Desk