HW News Marathi
महाराष्ट्र

नक्षलींकडून पोलिसांनी हस्तगत केले घोडे!

गडचिरोली : आजवर अनेक नक्षलविरोधी कारवाया सुरक्षा दलांकडून करण्यात आल्या. त्यात नक्षल्यांच्या अनेक वस्तूही हस्तगत करण्यात आल्या. कधी बंदुका, कधी काडतुसे, तर कधी स्फोटके. परंतु, शनिवारी दुपारी गडचिरोली, छत्तीसगडच्या सीमेवर करण्यात आलेली नक्षलविरोधी कारवाई काहीशी वेगळी होती. कारण पोलिसांना घाबरून पळ काढताना नक्षल्यांनी मागे ठेवलेल्या सामानामध्ये चक्क घोड्यांचा समावेश होता.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, रायफली आणि आयईडीसारखी आधुनिक घातक उपकरणे वापरणारे नक्षली थेट घोड्यांचा वापर का करू लागले? पण त्यालाही कारणे आहेत. छत्तीसगडचा सीमावर्ती भाग हा उंच उंच डोंगररांगा आणि घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. येथून गाड्या फिरवणे कठीण होऊन बसते. तसेच हा भूभाग दूरवर पसरलेला असल्यामुळे पायी प्रवास करणे किंवा मालाची वाहतूक करणेही जिकिरीचे होते. त्यामुळे येथील कुख्यात नक्षली आजही घोड्यांचा वापर करतात. त्यामुळेच या कारवाईत पोलिसांना नक्षलींचे घोडे मिळाले. नक्षलविरोधी कारवाईत घोडे हस्तगत करण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे.

गडचिरोली व छत्तीसगढमधील नारायणपूर सीमेवर अबुजमाड भागात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. त्या वेळी तुंडेवारा व कुपनार गावाजवळ नक्षल – पोलिसांमध्ये चकमक उडाली. या वेळी पोलिसांचा वाढता जोर पाहून नक्षलींनी तेथून काढता पाय घेतला. त्यांचे साहित्य जागीच टाकून ते पळाले. पोलिसांना घटनास्थळी तीन रायफली, सहा घोडे आणि अन्य नक्षली साहित्य मिळाले. या कारवाईत घोडे सापडल्याने या भागात भूपतीसारख्या नक्षल्यांच्या म्होरक्याचा वावर असल्याचा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान, गेल्या महिन्याभरात विविध कारवायांत पोलिसांनी ४ नक्षलींना कंठस्नान घातले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१२वीच्या परीक्षांबाबत निर्णय नाहीच! मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेवर वर्षा गायकवाड म्हणतात…

News Desk

रेल्वेतून चालते विषारी सापांची तस्करी

News Desk

उर्जा क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणार! – उपमुख्यमंत्री

Aprna