मुंबई | अमली पदार्थ नियंत्रण विभागाचं (एनसीबी) एक पथक आज (६ सप्टेंबर) सकाळीच सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या घरी दाखल झाले आहे. एनसीबीने तिला समन्सही बजावले आहे. कोणत्याही क्षणी एनसीबी रिया चक्रवर्तीला ताब्यात घेऊ शकते. सुशांत सिंह प्रकरणातील ड्रग्ज अँगलवर तपास करण्यासाठी रियाची कसून चौकशी होत आहे.
समन्स बजावताना एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी रियाला दोन पर्याय दिले. यामध्ये रियाला चौकशीत सहभागी होण्याचं आवाहन करताना तिने स्वतःहून चौकशीसाठी यावं किंवा तीनं आत्ता आमच्या टीमसोबत चौकशीसाठी चलावं. एनसीबीचे सहसंचालक समीर वानखेडे म्हणाले, रियाला समन्स देण्यात आलं आहे. यावेळी ती स्वतः घरी हजर होती.
The team has come to serve the summon. It depends upon her, as she (#RheaChakraborty) has to join investigation. She can come on her own or she can come with the team: Narcotics Control Bureau (NCB) https://t.co/KZMXrCb90Z
— ANI (@ANI) September 6, 2020
एनसीबीची टीम आजच रिया चक्रवर्तीची याप्रकरणी चौकशी करणार असून रिया चौकशीसाठी सकाळी साडेदहा वाजता स्वतःहून एनसीबीच्या कार्यालयात पोहोचणार असल्याचे सुत्रांकडून कळते. त्यामुळे आता पुढे हे प्रकरण कोणते नवे वळण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.