HW News Marathi
महाराष्ट्र

वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवत मलिकांचा पुन्हा गंभीर आरोप

मुंबई | एनसीबीचं झोनल डायडेक्टर समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला दाखवून पुन्हा एकदा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले आहे. वानखेडेंच्या दाखल्यावर समीर दाऊत वानखेडे असे नाव आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करणार असून विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली आहे. तिथेही कागदपत्रं दिली आहेत. तिथे चौकशी होईल आणि त्यांची नोकरी निश्चित जाणार आहे, असा खळबळजक मलिकांनी आज (१८ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेतून केला आहे.

दरम्यान, तसेच मलिकांनी वानखेडेंचे दोन्ही शाळेचं दाखलं दाखविले. या दोन्हीमध्ये वानखेडेंचे नाव समीर दाऊत वानखेडेंचा उल्लेख करण्यात आला आहे. “वनखेडेंचे ज्या मुलीशी लग्न करून घटस्फोट दिला. आणि दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यांची पहिली पत्नीसमोर येऊन त्यांचं सत्य समोर आणार आहेत. वानखेडेंनी त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मामेभावाला ड्रग्ज केसमध्ये अडकवून त्याला अटक केली. आजही तो मुलगा तुरुंगात असून वानखडेविरोधात काही न बोलण्याची धम्मकी त्यांनी दिली, असा आरोप मलिकांनी वानखेडेंवर केला आहे.

वानखेडेंकडून मलिकांवर मानहानीचा दावा

समीर वानखेडेंच्या वडिलांनी १ कोटी २५ लाखांचा मानहानीचा दावा माझ्याविरोधात दाखल केला असून त्यावर सुनावणी झाली. जातपडताळणी समितीकडे सर्व कागद पत्रे दाखल करणार आहे. वानखेडेविरोधातील सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर करणार असून आज सुनावणी पार पडणार आहे. तसेच जात पडताळणी समितीकडे सुद्धा सर्व कागद पत्रे दाखल करणार असल्याचं मलिकांनी सांगितलं.

 

समीर वानखेडे हे खोट्या नोटांचे खिलाडी आहेत. त्यांना बनावट सर्टिफिकेट बनवणं कितीसं अवघड आहे. ते फर्जीवाडा आणि बनावट नोटात मास्टर आहेत. त्यांनी जन्माचं बर्थसर्टिफिकेट दाखवावं. खोटी कागदपत्रं दाखवू नका. त्यांच्या

विरोधात जात पडताळणी समितीकडे तक्रार झाली आहे. तिथेही कागदपत्रं दिली आहेत. तिथे चौकशी होईल आणि त्यांची नोकरी निश्चित जाणार आहे.

त्यांनी 1993मध्ये खाडाखोड करून कागदपत्रं मिळवली. रजिस्टर गहाळ केलं. पण हे सर्व कागदपत्रं स्कॅन आहेत. खोट्या कागदपत्रांवरच त्यांनी नोकरी मिळवली आहे. त्यामुळे त्यांची नोकरी जाणार हे निश्चित आहे, असं त्यांनी सांगितलं.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्र्यांच्या घरावरील छापेमारीवर आजी गृहमंत्र्यांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

लता मंगेशकरांना कोरोनाची लागण; राजकीय नेत्यांनी केली प्रार्थना

News Desk

पुण्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारीपदी अजित पवारांच्या मर्जीतील विजय देशमुख यांची नियुक्ती !

News Desk