HW News Marathi
महाराष्ट्र

वानखेडेंना पुन्हा NCB च्या संचालक पदावर ठेवण्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू; मलिकांचा आरोप

मुंबई | राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वानखेडेंचा एनसीबीच्या संचालक पदाचा कार्यकाळ संपला असून हा वानखेडेंचा कार्यकाळ वाढवण्यासाठी राज्यातील भाजपचा बडा नेता दिल्लीत लॉबिंग सुरू केल्याचा आरोप मलिकांनी आज (२ जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे. दरम्यान, मलिकांनी पत्रकार परिषदेत एनसीबी अधिकारी आणि पंचमध्ये झालेल्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. 

मलिकांनी म्हटले, “एनसीबीकडून कशा पद्धतीने बोगस कारवाय केल्या जात असल्याचे असल्याचा आरोप मलिकांनी केला. यासंदर्भात त्यांनी ऑडिओ क्लिप ऐकवून वानखेडेंवर निशाणा साधला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये मॅडी नावाचा पंच आहे आणि त्याला किरण बाबू नावाच्या अधिकाऱ्याने फोन केला. आणि एका जुन्या प्रकरणात पंचनाम्यावर सही कर आणि आमच्या समोर पंचना केला आहे. तसेच समोर कारवाई केली आहे, असेत त्या आहे. हे सर्व अधिकारींनी सांगत आहे. यानंतर मॅडी नावाचा पंच घाबरून केला होता. यानंतर मलिकांनी अजून एक ऑडिओ क्लिप ऐकवली त्यात वानखेडेचा आवाज असूनत्यांनी मॅडी पंचला सही करा काही होणार नाही, असे म्हटले आहे. या प्रकरणावरून आता एसआयटी वानखेडे आणि बाबू नावाच्या अधिकाऱ्यावर कारवाई होणार का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

वानखेडेंच्या कार्यकाळासाठी भाजपनेत्याची लॉबिंग

वानखेडेंचा एनसीबीच्या विभागीय संचालक पदाचा कार्यकाळ संपला आहे. तरी सुद्धा अजूनही वानखेडेंचा कार्यकाळ एक्स्टेन्शन दिले की नाही किंवा त्यांच्याकडे नवी जबाबदारी दिली का?, याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही, असे म्हणत मलिकांनी वानखेडेंवर निशाणा साधला. मलिक म्हटले, “वानखेडे खोट्या बातम्या पेरत आहेत. मला एक्सटेन्शन नकोय, मी तीन महिने सुटीवर जाणार आहे. तर दुसरीकडे मला मिळालेल्या माहितीनुसार, वानखेडेला पुन्हा एनसीबीच्या विभागयी संचालक पदावर ठेवण्यासाठी दिल्लीत लॉबिंग सुरू आहे. यात भाजपच्या मोठे नेते वानखेडेसाठी गृहमंत्रालयात लॉबिंग करत आहे,” असे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

होळीमध्ये ‘कोरोना’च संकट जळून खाक व्हावे !

News Desk

वुहानमध्ये अडकलेल्या ९० भारतीयांपैकी ८ जण महाराष्ट्रीयन..

Arati More

काँग्रेसनंतर आता राष्ट्रावादीचाही कोल्हापुरात स्वबळाचा नारा!

News Desk