HW News Marathi
महाराष्ट्र

पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले !

पुणे | गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी पक्षला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर आता महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काल (२६ जुलै) पक्षाचा आणि पदाचा राजीनामा दिला आहे. “संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले.” असे खोचक शब्दात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवरून यामुळे नेते पक्ष सोडून जाणाऱ्यांवर टीका केली आहे.

रोहित यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, “संधी आणि संधीसाधू या दोन शब्दात खूप मोठ्ठा फरक आहे. पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले. आजही नेत्यांच्या नावापुढे राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या किंवा नेते असे लावले जाते आणि त्यानंतरच त्यांची दखल घेतली जाते. हे त्यांना देखील माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक गोष्ट जरूर लक्षात ठेवावी. जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नसता तर आपणास आमंत्रण देण्यासाठी कोणीही आले नसते, या विधानाने राष्ट्रवादीचे माजी मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्याकडे स्पष्ट टीकास्त्र सोडले आहे.

रोहित पुढे म्हटले, “तसेही पक्ष सोडून जाणाऱ्या लोकांची व्यक्तिगत कारणे असतील देखील पण एखाद्या व्यक्तीच्या पक्ष सोडून जाण्याने पक्ष संपत नसतो. यातूनच नवी भरारी घेता येते. तसेही भाकरी बदलण्याचा विचार करताना भरडे पीठ आपोआप बाजूला गेलेले कधीही चांगलेच असते.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला कोणताही धोका नाही”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

News Desk

मुंबईत 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार; प्रतिलिटर 80 रुपये मोजावे लागणार

Aprna

“सिंग यांचे पत्र कोणाला खुश ठेवण्यासाठी आहे त्याचं मी नाव घेणार नाही”, जयंत पाटील यांचं मोठं विधान

News Desk