HW News Marathi
देश / विदेश

“मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, मिटकरींचा थेट फडणवीसांवर निशाणा 

मुंबई | “मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ??”, असा बोचरा सवाल राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत अमोल मिटकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (२० ऑक्टोबर) देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी, पंतप्रधान नेमके काय बोलणार ? कोणती मोठी महत्त्वाची घोषणा करणार ? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. दरम्यान, पंतप्रधानांच्या याच संबोधनानंतर अमोल मिटकरींनी भाजपवर निशाणा साधला आहे.

अमोल मिटकरी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, “मोदींच्या भाषणाला थिल्लरपणा म्हणायचा की चिल्लरपणा ?? बिहार बद्दल प्रेम उतू येणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या अनाथ बाबत शांत का मोदी जबाब दो.” दरम्यान, काल (१९ ऑक्टोबर) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अशीच टीका केली होती. “मुख्यमंत्र्यांना अशी थिल्लरबाजी करणं शोभत नाही. मोदीजी थेट लडाखला जातात. तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये.”, असे फडणवीस म्हणाले होते.

मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर काय टीका केली होती ?

“बिहारमध्ये निवडणुकीचा प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा. फडणवीस सध्या नियमितपणे बिहारला जात आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी दिल्लीतही जावं. ते दिल्लीत गेलेत तर मग पंतप्रधान मोदी देखील घराबाहेर पडतील”, असा खोचक सल्लाही मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना दिला होता. त्याचप्रमाणे, “केंद्राकडे मदत मागितली तर बिघडलं कुठे?”, असा सवालही मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर, ४२ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर येणार

News Desk

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk

Breaking News : तिहेरी तलाक विधेयक मंजूर

News Desk