HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, पवारांनी केले ‘आप’चे अभिनंदन

sharad pawar on bhima koregoan

मुंबई | दिल्ली विधानसभा निवडणुकीचे आज (११ फेब्रुवारी) निकाल हाली आले आहे. यात दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांना स्थान दिली आहे. केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले आहे. भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला असून भाजपच्या पराभवाची मालिका आता थांबणार नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. शरद पवार पुढे म्हणाले की, भाजपही देशाची आपत्ती असून जाणिवपूर्वक धार्मिक कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न फसला.

तसेच ‘दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘झाडून विजय’ मिळवल्याबद्दल अरविंद केजरीवाल आणि आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन!’, असे ट्वीट शरद पवार यांनी केले. शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या बद्दलत्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली की, काही लोक भाषण ऐकायला येतात, तर काही फक्त बघायला येतात. आणि राज ठाकरेंना गांभीर्यांनी घेण्याची गरज नाही, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. दिल्लीतील आपच्या विजयावर पुढे शरद पवार म्हणाले की, भाजपला पर्याय देणाऱ्या शक्तीला लोकांनी पाठिंबा दिला.

 

शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्तवाचे मुद्दे

 • जे शाहीनबागमध्ये होते ते बघता, लोकांना धार्मिक कटुता मान्य नाही.
 • राज ठाकरेंच्या बद्दलत्या भूमिकेवर प्रतिक्रिया, काही लोक भाषण ऐकायला येतात, तर काही फक्त बघायला येतात.
 • भाजप ही देशाची आपत्ती, शरद पवारांचा भाजपवर हल्लाबोल
 • राज ठाकरेंना गांभीर्यांनी घेण्याची गरज नाही
 • किमान समान कार्यक्रमावर स्थानिक पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे
 • भाजपला पर्याय देणाऱ्या शक्तीला लोकांनी पाठिंबा दिला
 • दिल्लीच्या निकालाचे आश्चर्य वाटले नाही
 • भाजपच्या पराभवाची मालिका थांबणार नाही
 • शरद पवारांकडून केजरीवालांचे अभिनंदन
 • दहशतीच्या वातावरणामुळे भाजपचा पराभव
 • भाजपचा धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न फसला
 • जाणिवपूर्वक धार्मिक कटुता निर्माण करण्याचा प्रयत्न फसला
 • राहुल गांधींना दंडुके मारण्याची भाषा करू नये
 • दिल्लीचा निकाल दिल्ली पुरता मर्यादीत नाही

Related posts

‘किसान क्रांती पदयात्रा’ आंदोलन अखेर मागे

अपर्णा गोतपागर

हनुमान हे खेळाडू होते !

News Desk

हिंदुत्व भडकले, ममतांमुळे हे झाले, त्याबद्दल दीदींचे आभार!

News Desk