HW News Marathi
देश / विदेश

पाकिस्तानी बहीण बांधणार मोदींना राखी!

नवी दिल्ली – हिंदुत्ववादी नेता अशी प्रतिमा असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क पाकिस्तानात मानलेली बहीण आहे. कमर मोहसिन शेख असे त्यांच्या या बहिणीचे नाव असून ती गेली २२ वर्षे मोदींना राखी बांधते. आजही रक्षा बंधनानिमित्त हा राखी बांधण्याचा सोहळा रंगणार असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

लग्नानंतर कमर मोहसिन शेख या भारतात आल्या होत्या. तेव्हापासून त्या इथल्याच नागरिक आहेत. नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असताना कमर मोहसिन शेख यांनी मोदींना पहिल्यांदा राखी बांधली होती. आता नरेंद्र मोदी पंतप्रधान असल्याने ते कामात व्यग्र असतील, त्यामुळे कमर यंदा मोदींना राखी बांधणार नव्हत्या. पण काही दिवसांपूर्वी मोदींनी त्यांना स्वत: फोन करून रक्षाबंधनाची आठवण करून दिली, से त्यांनी सांगितले. मोदींनी मला स्वतःहून फोन केल्याने मला अतिशय आनंद झाला आणि लगेचच रक्षा बंधनाच्या तयारीला लागल्याचे शेख म्हणाल्या.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा मतदारसंघ वाराणसीतील दुर्गाकुंड येथील वृद्धाश्रमातील विधवा महिलांनीही स्वतः राख्या बनवून पंतप्रधान मोदींना पाठवल्या आहेत. या आश्रमात राहणा-या महिला पंतप्रधानांना आपल्या भावासमान मानतात. पंतप्रधान स्वतः रक्षाबंधनादिवशी आश्रमात येऊ शकत नाहीत. मात्र आपण आपल्या हाताने बनवलेल्या राख्या त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात,अशी भावना या महिलांनी व्यक्त केल्या. दुसरीकडे वाराणसीतील मुस्लिम महिलांनीही मोदींसाठी स्वत: राख्या बनवल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यमुना एक्सप्रेसवेवर बस-ट्रकचा भीषण अपघात, ८ जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी

News Desk

थायलंडच्या ‘रेस्क्यू ऑपरेशन’मध्ये मराठमोळ्या किर्लोस्करांचे अमुल्य योगदान

News Desk

अमेरिकेतील मध्यवर्ती निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे वर्चस्व कायम

News Desk