HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

केंद्राने शहाणपणा दाखवावा, अजूनही वेळ गेलेली नाही ! । शरद पवार

नवी दिल्ली । “केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. अजूनही वेळ गेलेली नाही. एकेकाळी अस्वस्थ असलेला पंजाब आता सावरला आहे. त्या पंजाबला पुन्हा अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक करू नका”, असे म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज (२६ जानेवारी) दिल्लीत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे, केंद्र सरकारला इशारा हा सूचक दिला आहे. गेल्या ६० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शांततापूर्ण मार्गाने सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने आज (२६ जानेवारी) अचानक हिंसक वळण घेतले आहे. यासाठी कोण जबाबदार आहे ? असा प्रश्न देशभरात उपस्थित होत असताना आता शरद पवार यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्र सरकारला इशारा देताना शरद पवार म्हणाले की, “केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. अजूनही वेळ गेलेली नाही. टोकाची भूमिका घेऊ नये. शेतकऱ्यांच्या रास्त प्रश्नांसंबंधित अनुकूल निर्णय घ्या. आपल्या बळाचा वापर करून एखादा निर्णय घेणे योग्य नाही. सरकारने बतशी मानसिकताही ठेवू नये. एकेकाळी अस्वस्थ असलेला आपण पाहिलेला पंजाब आपण कुठे सावरलेला आहे. पुन्हा पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचे पातक मोदी सरकारने करू नये”, असे आवाहन शरद पवार यांनी केंद्र सरकारला केले आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, “देशाच्या प्रमुखाने शेतकऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीतच सुरू आहे. चर्चा करायला हरकत होती? मी शेतकऱ्यांचे मोर्चे यापूर्वीही पाहिले आहेत. अगदी मोर्च्यांवर गोळीबार झालेलाही मी पाहिला आहे. पण असा प्रकार पहिल्यांदाच झाले. इथे शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरविणे, पाकिस्तानी संबोधणे झेंड्यावरून वक्तव्य करणं हे यावेळी प्रथमच पाहिले. हा आततायीपणा आहे”, असे शरद पवार म्हणाले

 

Related posts

मोदींच्या श्रद्धेवर कोणी प्रश्नचिन्ह उभे करू नये, सेनेचा मोदींना टोमणा

News Desk

सत्तेचा माज आला असेल तर ती सत्ता उलथवून टाकण्याची ताकद आमच्यात आहे !

News Desk

दिल्लीच्या चांदनी महल भागातील १३ मशिदीमध्ये राहणाऱ्या १०२ जणांपैकी ५२ कोरोना पॉझिटिव्ही

News Desk