HW News Marathi
महाराष्ट्र

आता सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही !

मुंबई | “सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही, आमच्याकडे आता भरपूर वेळ आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीवरून भाजपला लगावला. पवार पुढे म्हणाले की, “सरकार कसे चालणार, धोरण कसे असणार याविषयी स्पष्टता येत नाही. तोपर्यंत कोणताही निर्णय घेणे कठीण आहे, असे हीते म्हणाले. तसेच सरकार बनवायचे की नाही, बनवायचे असेल तर कोणत्या मुद्द्यावर आणि कोणत्या धोरणावर हे आधी ठरेल. आता सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही, सत्तावाटपावर चर्चा होईल,” असे पवार म्हणाले. यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार आणि अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने वेळ वाढवून मागितल्याचे पत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पाठिवले होते. मात्र, राज्यपालांनी आमची अट मान्य केले नाही, असे पवार यांनी म्हटले. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर पवारांनी प्रतिक्रिया दिली की,”आता सत्ता स्थापनेसाठी आम्हाला काही घाई नाही ” पवारांनी आज (१२ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत म्हणाले. कोणत्याही निर्णयापूर्वी आमची बैठक होणे गरजेचे होते. दोन्ही पक्षांची निवडणुकीत आघाडी झालेली आहे, शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत व्यापक चर्चा झाली, दोघांच्या सहमतीनंतर निर्णय घेऊ, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. यासाठी अहमद पटेल, मल्लिकार्जुन खर्गे वेणुगोपाल,अशोक चव्हाण, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पेटल यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे बडे नेते यावेळी उपस्थित होते.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त पत्रकार परिषदे

  • राष्ट्रवादीने काँग्रेस चर्चा करण्यासाठी वेळ वाढवून मागितला होता, असे पत्र देण्यात आले होते. मात्र, राज्यपालांनी ही मागणा मान्य केली नाही.
  • राज्यपालांनी आता आम्हाला खूप वेळ दिला | शरद पवार
  • शिवसेनेने ११ नोव्हेंबर रोजी अधिकृतरीत्या महाआघाडीशी संपर्क साधला
  • एकत्र लढलो, काँग्रेससोबत चर्चेनंतर निर्णय | शरद पवार
  • सत्तास्थापनेसाठी आता आम्हाला घाई नाही | शरद पवार
  • गोवा, कर्नाटकासह अन्य राज्यांत भाजपची मनमानी | पटेल
  • उद्धव ठाकरेंनी काल (११ नोव्हेंबर) प्रथमच सोनिया गांधींना फोन केला | पटेल
  • शिवसेनेसोबत जाण्यासाठी चर्चेची प्रक्रिया सुरु | शरद पवार
  • सरकार कसं बनवायचं हे स्पष्ट झाल्याशिवाय निर्णय नाही.
  • राज्यपालांनी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी बोलविले नाही – अहमद पटेल
  • शिवसेनेबाबात वेळ घेण्यास वेळ लागेल – प्रफुल्ल पटेल

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘भारतीय स्वातंत्र्य व महान लोकशाहीचा गळा दाबण्याचाच प्रकार’, सेनेची केंद्र सरकारवर टीका!

News Desk

दिवसरात्र आपले रक्षण करणाऱ्या पोलिस कॉन्सटेबलचीही आर्थिक मदत

News Desk

समिती स्थापन झाल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, आजही राज्यात एसटी सेवा बंद

News Desk