कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. कोल्हापुरमधील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोरोनाच्या काळात सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे,सुशांतप्रकरणानंतर भाजपने कंगणाला पुढे केले आहे असेही ते म्हणाले मात्र यातही ते तोंडघशी पडत आहेत,असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला.
भाजपमध्ये खडसे-फडणवीस यांच्यामधील अंतर्गत कलर सध्या सातत्याने समोय येतोय.खडसेंनी फडणवीसांवर अनेक आरोप केले आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे ड्रायक्लिनर आहेत असंही खडसे म्हणाले होते. त्यावर मंत्री मुश्रीफ यांनी आज प्रतिक्रीया दिली ‘भाजपमधील हा पक्षांतर्गत वाद आहे. पण, फडणवीस हे ड्रायक्लीनर आहेत, हे खडसेंचे वाक्य मला पटले. फडणवीसांनी विनाचौकशी अनेकांना क्लीनचिट दिली आहे. खडसेंवर मात्र अन्याय झाला. खडसेंबद्दल मला सहानुभूती आहे.’ असे म्हणत त्यांनी फडणवीसांना सुनावले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.