HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांच्या भेटीसाठी अजित पवार ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

मुंबई | राष्ट्रवादी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (२७ सप्टेंबर) त्यांच्या राजीनाम्यानंतर नॉट रिचेबल होते. मात्र, आज (२८ सप्टेंबर) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अजित पवार त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. सिल्व्हर ओक निवासस्थानी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार तिघांसोबत बैठक होणार आहे. अजित पवारांच्या अचानक राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात पवार कुंटुंबियामध्ये अंतर्गत वाद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यामुळे आज पवारांसोबतच्या बैठकीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

बैठक पार पडल्यानंतर अजित पवार माध्यमांशी संवाद साधून त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांनी ईडीविरोधात घेतलेल्या आक्रमक पवित्रा घेतला होता. सुरक्षेच्या कारणास्तव पवारांनी ईडीच्या कर्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केला होता. यानंतर पवार पुण्याती पूरपरिस्थितीचा आढवा घेण्यासाठी पुण्याच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, सायंकाळी अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात भूकंप झाला होता.

अजित पवार यांनी काल आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मेलद्वारे पाठविला होता. अजित पवार हे बागडे यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. याबाबत बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. ते माझ्याशी फोनवर बोलल्याने तो मंजूर केला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSC परिक्षेचे नविन वेळापत्रक लवकरचं जाहीर करणार -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

News Desk

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी आज गोव्याच्या राज्यपाल पदाची घेतली शपथ

News Desk

फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय!

News Desk