HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा आणि राजकीय कार्यकाळात चौथ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. विधान भवनात आज (३० डिसेंबर) शपथ घेणाऱ्या ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे.

अजित पवार यांनी यापूर्वी बारामतीमधून सात वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. अजित पवार हे कार्यकाळात नोव्हेंबर २०१०- सप्टेंबर २०१२ पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर डिसेंबर २०१२ ते सप्टेंबर २०१४ साली त्यांनी उपमुख्यमंत्री पद भूषविले होते. त्यानंतर अजित पवार यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०१९ रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. यानंतर अवघ्या तीन दिवसात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार कोसळले. आणि यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये देखील अजित पवारांना चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पद मिळाले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहनिर्माणाची कामे त्वरीत पूर्ण करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची १९वी ऊस परिषद ऑनलाईन पद्धतीने होणार

News Desk

मंत्रालयात शॉट सर्किटमुळे बत्ती गुल, मंत्र्यांची दालने अंधारात

News Desk