मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं नाव न घेता टोलेबाजी केली. “ज्यांचं डिपॉझिट वाचत नाही त्याची काय एवढी नोंद घेता तुम्ही? उभा राहिल्यानंतर जनतेचा पाठिंबा आहे का? प्रमुख पक्षाचं तिकीट घेऊन पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”, असं अजित पवार म्हणाले आहेत.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी इथल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण केलं. मात्र या पुतळ्याचं अनावरण उद्या १३ फेब्रुवारीला शरद पवार यांच्या हस्ते नियोजित होतं. त्यापूर्वीच पडळकरांनी हे अनावरण उरकून घेतलं. त्याचवेळी त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर घणाघाती टीका केली. त्याबाबत अजित पवारांना विचारण्यात आलं होतं.
अजित पवार म्हणाले, “अहो त्यांची टीका म्हणजे विनाशकाली विपरीतबुद्धी सुचलीय. त्यांचं डिपॉझिट कुणी ठेवत नाही, त्यांचं काय एवढी नोंद घेताय तुम्ही, उभं राहिल्यानंतर त्यांना जनतेचा पाठिंबा नाही. भाजपसारख्या प्रमुख पक्षाकडून तिकीट घेऊनही पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त होतं. आणि तुम्ही मला प्रेस कॉन्फरन्मध्ये प्रश्न विचारताय. काय महत्त्व देताय”,
गोपीचंद पडळकर काय म्हणाले?
अहिल्यादेवींचं काम अखंड हिंदुस्तानात आहे. इतिहासात नोंद घेणारं त्यांचं काम आहे. त्यांचं मंदिराच्याबाबत जिर्णोद्धार असो, प्रजाहितकारी म्हणून त्यांची जगभर कीर्ती आहे. अशा व्यक्तिमत्त्वाच्या पुतळ्याचं अनावरण हे चारित्र्यसंपन्न, निष्कलंक माणसाच्या हातून व्हायला हवं ही आमची इच्छा होती. परंतु ज्यांच्या हस्ते उद्घाटन ठेवलं होतं, ते शरद पवारांचं वागणं, विचार हे अहिल्यादेवींच्या उलट आहे. त्यामुळे आम्ही युवा मित्रांनी मेंढपाळ्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण पहाटे केलं.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.