HW News Marathi
महाराष्ट्र

नवाब मलिकांच्या घरी पहाटे ED अधिकारी; दाऊद मालमत्तेच्या व्यवहारासंबंधी कार्यलयात चौकशी सुरू

मुंबई |  दाऊद इब्राहिम मनी लॉड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ईडी कार्यालयता घेऊन गेले आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पहाटे ४.३० वाजता मलिकांच्या पोहोचले. ईडीच्या कार्यलयात मलिकांची सकाळी ७ वाजता घेऊन केले तर ७.४५ वाजल्यापासून कार्यलयात त्यांची चौकशी सुरू आहे.  मलिकांच्या अधिकाऱ्यांसोबत सीआरपीएफचे जवान होते. या पार्श्वभूमीवर मलिकांच्या घराबाहेर आणि ईडीच्या कार्यालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

गेल्या आठवड्यात ईडीच्या दिल्ली आणि मुंबईतील पथकांनी दाऊतची बहिण हसिना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या कुटुंबियांच्या मुंबईतील घरीत छापेमारी करून चौकशी केली होती. इक्बाल कासकरांची चौकशी केल्यानंतर मलिकांना समन्स बजावण्यात आला होता. त्यानंतर ईडीने आज (२३ फेब्रुवारी) पहाटे ४. ३० वाजता त्यांच्या घरी पोहोचले आणि यानंतर त्यांना सकाळी ७.४५ वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले. 

दरम्यान,  दाऊदचा खास ईक्बाल मिर्ची यांच्या वरळीतील मालमत्तेचा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर्स प्रा. लि. कंपनीने ठिकाणाचा विकास केल्याची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पटेलांच्या कंपनीने सीजे हाऊस  १५ मजली इमारत बांधली असून मिर्चीच्या कुटुंबियांना त्यांनी तिसऱ्या मजल्यावर ९ हजार चौरस फूट आणि चौथ्या मजल्यावर ५ हजार चौरस फूट असे १४ हजार चौरस फुटांचे बांधकाम दिले होते. ईडीने मिर्चीची सर्व ईडीची मालमत्ता जप्त केली असून या प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांची जबाब नोंदविण्यात आला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बीडच्या सोनेसांगवी सुर्डी गावात जागेच्या वादावरून अंत्यविधी रोखला

Aprna

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही

News Desk

MPSC परिक्षेबाबत मुख्यमंत्री लवकरचं तोडगा काढणार,नाना पटोलेंच आश्वासन!

News Desk