मुंबई | ‘राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केली आहे. ‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी जहरी टीका पडळकर यांनी केली आहे. यामुळे पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून टीका होत आहे.
मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून मा.@PawarSpeaks साहेबांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी@007Gopichand यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटतं.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 24, 2020
धजनंज मुंडेंनी ट्वीटमध्ये म्हटले, “राजकारणात नेम आणि फेम मिळवायचे असले की शरद पवार साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पहावे. बिरोबा यांना सद्बुद्धी देवो!” तसेच मंडल आयोग,नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून मा.शरद पवार साहेबांनी आम्हा बहुजनांच्या आयुष्याचे सोने केले हे महाराष्ट्राला वेगळे सांगण्याची गरज नाही.पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात हे वाईट वाटते,” असे दुसऱ्या ट्वीटमध्ये धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.
गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले
‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
संबंधित बातम्या
गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे
शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.