मुंबई | सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा या गायिकेने बलात्काराचा आरोप केला. राजकीय वर्तृळात या गोष्टीने खळबळ माजली आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्यावरील आरोपानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. मुंडे यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक इथं भेट घेतली आहे. आज प्रत्यक्ष भेट घेत आरोपानंतर मुंडे यांनी स्वत:ची भूमिका पवारांसमोर मांडली आहे.
धनंजय मुंडे यांनी काल फेसबूक पोस्ट करुन त्यांची भूमिका मांडली होती. दरम्यान, आज शरद पवारांची भेट घेण्याआधी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्या बैठकीत धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी परळी मतदार संघातील अनेक प्रस्ताव दाखल झाल्याने ते तातडीने मंजूर व्हावेत अशी भूमिका यावेळी मांडली होती. त्यामुळे आधी अजित पवार मग शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता उपमुख्यमंत्री श्री.@AjitPawarSpeaks यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत सहभागी झालो. या योजनेखाली माझ्या परळी मतदार संघातील अनेक प्रस्ताव दाखल झाल्याने ते तातडीने मंजूर व्हावेत अशी भूमिका यावेळी मांडली. pic.twitter.com/9kWcBnlpTp
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 13, 2021