HW News Marathi
महाराष्ट्र

…आणि शरद पवारांबद्दल बोलताना हसन मुश्रीफांना अश्रु अनावर झाले

कोल्हापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज ८० वा वाढदिवस संपूर्ण राज्यभरात उत्साहास साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. पण पवारांवर बोलताना मुश्रीफ थोडावेळ थबकले. गहिवरले… भावूक झालेल्या मुश्रीफांना यावेळी अश्रू अनावर झाले होते. हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांना व्हर्च्युअल पद्धतीने आज शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्याबाबतच्या अनेक आठवणी जागवल्या. मिरज दंगलीनंतर मुश्रीफ निवडून आले होते. त्यानंतर शरद पवार यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख करताच मुश्रीफ गहिवरून गेले. त्यांना अश्रू रोखणे अवघड झाले होते.

पवारांना व्हर्च्युअल पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी ते कोल्हापुरातून सहभागी झाले होते. शरद पवार यांच्या विषयी बोलताना मंत्री मुश्रीफ यांना स्टेजवरच अश्रू अनावर झाले. शरद पवार यांनी राजकारणात दिलेली संधी, केलेलं मार्गदर्शन या विषयाचे अनेक किस्से यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एक किस्साही आवर्जून सांगितला, तो होता २००९च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरचा. २००९च्या विधानसभा निवडणुकीआधी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेशोत्सवादरम्यान जातीय दंगल झाली होती.

या दंगलीचा परिणाम म्हणून त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला. मात्र याही परिस्थितीत मुश्रीफ कागलमधून विक्रमी मतांनी निवडून आले होते.. या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझा कार्यकर्ता निवडून आला याचा मनस्वी आनंद असल्याचा उल्लेख केला होता. या उल्लेखा विषयाचा अनुभव सांगताना मंत्री मुश्रीफ यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसींचा इम्पिरिकल डेटा मिळवून देण्यासाठी तुम्हीही केंद्राकडे पाठपुरावा करा – उध्दव ठाकरे

News Desk

पालक व शिक्षण विभागाने सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका ठेवावी! – डॉ.नीलम गोऱ्हे

Aprna

ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, आरक्षण प्रश्नांवर आवाज उठविणार, पंकजा मुंडे आक्रमक !

News Desk