HW News Marathi
महाराष्ट्र

हेलिकॉप्टरमुळे लोकसभेचं तिकीट गेलं! सुजय विखेंच्या या आरोपात तथ्य नाही,राष्ट्रवादीने दिले उत्तर

अहमदनगर | लोकसभा निवडणुकीत आपल्याला हवी ती जागा न मिळाल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीने अहमदनगर दक्षिणची जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर सुजय विखे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती.आणि ज्या राष्ट्रवादीने तिकिट नाकारले होते त्या संग्राम जगताप यांचा पराभव केला होता. दरम्यान सुजय विखे यांनी आपल्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यासंबंधी गौप्यस्फोट केला आहे.

“हेलिकॉप्टर या एकमेव कारणामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने माझं लोकसभेला तिकीट कापलं,” असा दावा सुजय विखे यांनी नगरमध्ये सभेत बोलताना केला आहे. “शरद पवारांनी हेलिकॉप्टरसंबंधी प्रश्न विचारला आणि त्यानंतर आघाडीने तिकीट कापलं,” असं ते म्हणाले आहेत. “उमेदवारी देण्याअगोदर शरद पवार यांनी तू आताच जर हेलिकॉप्टरमधून फिरत असशील तर निवडून कसा येणार? असा प्रश्न मला विचारला होता. नंतर आघाडीने मला तिकीट नाकारलं आणि त्यानंतर जे काही झालं ते सगळं आपल्यासमोर आहे”, असं सुजय विखे म्हणाले. “पण त्यावेळी नुकसान वाटत असलं तरी आता त्याचे फायदे दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात काम करण्याचा आपल्याला अभिमान वाटतो,” असं त्यांनी सांगितलं आहे.

सुजय विखेंबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एचडबल्यू मराठीशी बातचीत करताना असे म्हटले की, सुजय विखे पाटील हे सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. आणि सुजय विखे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कधीच नव्हते. आणि निवडणूकीच्या काळात अशा बातम्या येत होत्या की ते राष्ट्रवादीत येणार पण तसं काही विशेष बोलणी झाली नव्हती. आणि देशांमधील एकंदरीत वातावरण पाहिलं तर सुजय विखे हे राष्ट्रवादीत येणार अशा चर्चा सुरु असतानाच वडील म्हणजेच राधाकृष्णच पक्ष सोडून भाजपमध्ये गेले. त्यामुळे सुजय यांचं राष्ट्रवादीत येण्याचं किती मन होतं हे स्पष्ट होतं. त्यामुळे हॅलिकॉप्टरचा जो ते आरोप करत आहेत त्यात काही तथ्य नाही, असे तपासे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जर वडील पक्ष सोडून जात होते तर मुलाला पक्षात येण्यात रुची होती का? असा प्रश्न महेश तपासे यांच्या बोलण्यातून उपस्थित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

News Desk

औरंगाबाद महापालिकेत ‘वंदे मातरम’वरून तोडफोड, video

News Desk

एनडीए’चा शेवटचा ‘खांब’ही कलथून गेला !

News Desk