HW News Marathi
महाराष्ट्र

ऐनवेळी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकरांना भाजपकडून नोटीस

अहमदनगर | अहमदनगर महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मारलेला डाव विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मनाला लागल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर महापालिकेचे नवनिर्वाचित सभापती मनोज कोतकर यांना भाजपकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. मनोज कोतकर यांनी दोनच दिवसांपूर्वी स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपचे अहमदनगर शहराध्यक्ष भैया गंधे यांनी कोतकरांना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.

राष्ट्रवादीने ऐनवेळेस भाजपातून मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेतले आणि उमेदवारी दिली होती. मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे स्थानिक भाजप नेत्यांनी फारसा आक्षेप घेतला नाही. पण, या राजकीय खेळीवर आता फडणवीस यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे भाजपने मनोज कोतकर यांनापक्षांतर बंदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.

विशेष म्हणजे, स्थायी समिती सभापती निवडणूक लढविण्यास शिवसेना इच्छुक होती आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय होणारच हे पक्के होते. परंतु, ऐनवेळी मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीने आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंच्या भविष्यवाणीवर महाविकासआघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र

News Desk

दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

News Desk

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसलेंच्या कार्यालयावर ईडीची धाड

News Desk