HW News Marathi
महाराष्ट्र

लॉंग ड्राईव्हला मला ‘या’ व्यक्तीसोबत जायला आवडेल – रोहित पवार

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू तरूणाईमध्ये फार लोकप्रिय आहेत. अनेकजण त्यांच्या राजकीय कार्यासह वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी फार उत्सुक असतात. ते म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार. नुकतेच रोहित पवार यांनी झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती दिली.

या मुलाखतीदरम्यान रोहित पवार यांना लाँग ड्राईव्हला कोणासोबत जायला आवडतं असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी पत्नी कुंतीसोबत जायला आवडेल असं उत्तर दिलं आहे. रोहित पवार म्हणाले, “मला गाड्यांची आवड असून भावंडांसोबत तसंच काही मित्रांसोबत फिरायला जाण्यास आवडतं. पण लाँग ड्राइव्हसाठी मला पत्नी कुंतीसोबत जायला आवडतं.”

दरम्यान, मला मुलांसोबत कार्टून पहायला देखील फार आवडतं. कारण यामुळे त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळतो आणि माझ्याही लहानपणीच्या आठवणी डोळ्यांसमोर येतात, असंही पवार यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी दीपस्तंभ ठरतील

Aprna

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा दाखल

News Desk

मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक राज्यपालांच्या भेटीला, वडेट्टीवार आणि भुजबळांना हटवण्याची केली मागणी

News Desk