HW News Marathi
महाराष्ट्र

प्रशांत किशोरची मला गरज नाही – शरद पवार

मुंबई | राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या वर्तुळात सुरू होती. मात्र, ही चर्चा नाकारत शरद पवार यांनी भविष्यातली राजकीय मोर्चेबांधणी कशी असेल, यावर भाष्य केले.

शरद पावार म्हणाले, “मला प्रशांत किशोर यांची मदत घ्यायची कोणतीच गरज नाही. तसंच सध्या मला सत्तेत बसण्याचीही कुठली महत्त्वाकांक्षा नाही. पण विरोधी पक्षांमध्ये समन्वयाचं राजकारण घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करेल”

‘मुंबई तक’शी पवारांनी काँग्रेसला हे खडे बोल सुनावले. इंडिया टुडे ग्रुपचं मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म असलेल्या ‘मुंबई तक’च्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त पवारांची दीर्घ मुलाखत घेण्यात आली. राजदीप सरदेसाई आणि साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्र तसंच देशभरातल्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. ठाकरे सरकार किती वर्ष चालणार, देशात महाराष्ट्राचा प्रयोग होणार का या प्रश्नांसोबतच त्यांनी काँग्रेसच्या सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं.

आजची काँग्रेस म्हणजे नादुरुस्त हवेलीच्या जमीनदारासारखी – शरद पवार

“आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातल्या एखाद्या जमीनदारासारखी झालीय. रया गेलेल्या हवेलीचा जमीनदार हे सगळं हिरवंगार शिवार माझं होतं, असं सांगतो. काहीशी तशीच अवस्था आजच्या काँग्रेसची झालीय.” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, विरोधी पक्षांमध्ये पंतप्रधानपदाच्या चेहऱ्यावरून मतभेद आहेत. काँग्रेची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असं सांगतात

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भुयारी गटार योजनेस राज्य शासनाची मंजूरी

News Desk

लोकसभेत राष्ट्रवादींच्या ‘या’ दोन खासदारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली

News Desk

पालघरमधील ११ हॉटेल्स होम कोरोंटाईन करणाऱ्यांसाठी राखीव

swarit