HW News Marathi
महाराष्ट्र

शहाण्याला शब्दाचा मार ही म्हण इथे लागू होईल की नाही माहित नाही – शरद पवार

तुळजापूर | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राज्यात परतीच्या पावसाने केलेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणी करणारं पत्र लिहित राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सर्वांचं लक्ष वेधलं होतं. या पत्रातून त्यांनी थेट शिवसेनेच्या हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केले होते. ज्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनीच राज्यपालांनी वापरलेली ती भाषा पदाची प्रतिष्ठा वाढवणारी नक्कीच नसल्याचे मत व्यक्त केलं आहे असं पवार म्हणाले. पुढे बोलताना पवार यांनी आतापर्यंत आपण कोणत्याही राज्यपालांनी असं व्यक्त केल्याचं पाहिलं नसल्याचं म्हटलं. “१९५७ सालापासून चे सर्व राज्यपाल मी पाहिलेत. त्यानंतर १९६७ पासूनच्या सर्व राज्यपालांशी माझा थेट संबंध आला पण कोणी असं वक्तव्य केलं नाही,” असं पवार यांनी म्हटलं आहे. तसेच खुद्द केंद्रीय गृमंत्र्यांनीच कानउघाडणी केल्यानंतर या पदावर राहयचं की नाही हा विचार करावा, असंही पवार यांनी राज्यपालांचे नाव न घेता म्हटलं आहे.

राज्याच्या राज्यपालांनी पदावर रहावे की नाही याबद्दल तुमचे काय मत आहे असा प्रश्न यावर पत्रकारांनी पवारांना विचारला. “हे सांगणारा मी कोण?,” असा प्रतिप्रश्न पवारांनी यावर उत्तर देताना विचारला. मात्र पुढे त्यांनी, “सेल्फ रिस्पेक्ट असणारा माणूस पदावर राहणार नाही,” असं म्हटलं. राज्यपाल, मुख्यमंत्री ही सर्व घटनात्मक पद असून त्याचा मान राखला गेला पाहिजे. राज्यपालांच्या पदाचा मान राखला गेला पाहिजे तसा मुख्यमंत्री पदाचाही मान राखला गेला पाहिजे. मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा राज्यपालांकडून ठेवली जात नसेल तर हे चिंता वाढवणारं असल्याचंही पवार यांनी यावेळी नमूद केले आहे.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना पवारांनी खास त्यांच्या शैलीत नाव न घेता राज्यपालांना टोला लगावला. आपल्याकडे एक म्हण आहे पण ती इथे लागू होईल की नाही सांगता येणार नाही. ती म्हण, शहाण्याला शब्दाचा मार अशी आहे. मात्र यातील हा शब्द इथे योग्य आहे की नाही सांगता येणार नाही, असं पवार यांनी म्हटलं आणि पत्रकारांमध्येही एकच हशा पिकला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विशेष कायदा करा, अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा !

News Desk

मुंबई पालिकेत कॉंग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळला

News Desk

प्रवीण दरेकरांना दिलासा, सोमवारपर्यंत अटक न करण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश

Aprna