मुंबई। महिलांच्या मुद्दयावर कळकळीने बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांच्यावर सुनेचा छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्या चव्हाण यांच्या सूनेने नातवाच्या जन्मासाठी सासरी छळ होत असल्याचा आरोप त्यांच्यावर केला आहे. विद्या चव्हाण त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यांविरोधात सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विद्या चव्हाणवरील आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली.
NCP leader Vidya Chavan and her family has been booked, in a case under the sections 498A, 354, 323, 504, 506 and 34 IPC, for alleged harassment of her daughter-in-law
— ANI (@ANI) March 2, 2020
विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत चव्हाण, मुलगा अजित (तक्रारदार सूनेचा पती) दुसरा मुलगा आनंद आणि शीतल (आनंद यांची पत्नी) अशा पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्यांदाही मुलगीच झाल्याने आपला छळ करण्यात येत होता, असा दावाही सूनेने केला आहे. विद्या चव्हणांच्या सूनेला पहिली मुलगी आहे. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मात्र मुदतीआधीच प्रसुती झाल्याने बाळ दगावले. त्यानंतर माझ्या छळात वाढ झाली, अशी सूनेने तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
विद्या चव्हाणांच्या सूनेने १६ जानेवारीला विलेपार्ले पोलीस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सूनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ४०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या प्रकरणावर विद्या चव्हाण यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेवरील आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीतही त्या दिंडोशी मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या, मात्र त्यांना पराभवाचा धक्का बसला.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.