HW News Marathi
महाराष्ट्र

कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही! – जितेंद्र आव्हाड

मुंबई | ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचा ‘ट्रेलर’ रिलीज झाल्यावर कोल्हेंवर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर त्यांच्या पक्षातील देखीन नेत्यांनी देखील त्यांनी नथुराम गोडसेच्या भूमिकेवरून त्यांना विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यात  राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हे साकारत असलेल्या नथुराम गोडसेच्या भूमिकेवर ट्वीट करत त्यांचा विरोध नोंदविला आहे. 

आव्हाड ट्वीटमध्ये म्हणाले, “डॉ. अमोल कोल्हे यांच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हे स्पष्ट होते की, अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका केलेली आहे. त्यांनी केलेली कृती जरी कलाकार म्हणून केली असली, तरी त्यामध्ये नथुराम गोडसेचे समर्थन आलेच आहे. कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही गांधी हत्येचे समर्थन करू शकत नाही.” ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट ३० जानेवारी २०२२ ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

‘व्हाय आय किल्ड’ या चित्रपटाचे चित्रीकरण २०१७ मध्ये झाले होते. त्यावेळी मी राजकारणात सक्रिय नव्हतो. तेव्हा नथूराम गोडसेची भूमिका साकारली होती. कलाकार जेव्हा एखादी भूमिका करतो. तेव्हा तो कलाकार त्या विचारधारेसोबत सहमत असतो असे नाही. मी केवळ एक कलाकार म्हणून ही भूमिका साकारली असून यांचा राजकीय विचारांसोबत संबंध जोडणे हे योग्य नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus : राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिला रुग्ण

swarit

‘लपून छपून काही होणार नाही, जे होईल ते समोरासमोर’, बाळा नांदगावकरांची माहिती

Jui Jadhav

टी-१ वाघिणीच्या मृत्यूनंतर गावकऱ्यांमध्ये जल्लोषाचे वातारण

swarit