HW News Marathi
महाराष्ट्र

अमोल कोल्हेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जावून भेट घेतली आहे. या भेटीमाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मनसेला आघाडीत सामील करुन घेण्याच्या चर्चा लोकसभा निवडणुकीच्या वेळी रंगल्या होत्या. यावर कोल्हेंच्या भेटींने शिक्कामोर्तब होणार का?, हे येणारा काळच सांगले.

तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यात मनसेला राष्ट्रवादी- काँग्रेस यांच्या आघाडीत सामील करून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजही आग्रही आहेत. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृह मंत्री अमित शहा यांच्याविरोधात महाराष्ट्रात प्रचार सभा देखील घेतल्या होत्या. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादी-काँग्रेसचे उमदेवार उभे होते. त्या ठिकाणी राज ठाकरेंनी सभा घेऊन मोदींविरोधात तोफ डागली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस,प्रवचने झाडणे बंद करा आता ! सामनातून टोला…

News Desk

ईडीने आज मुंबईत येस बँकेच्या कर्जदारांवर छापे टाकले

News Desk

स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna