HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर!

नागपूर।राज्यात आता महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. आणि प्रत्येक राजकीय पक्षाने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यात सुरवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर असलेला पहायला मिळतो आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आजपासून चार दिवस आता विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. यात ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.आता शरद पवार विदर्भावर कोणती जादु फिरवता हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पवारांचा विदर्भ दौरा महत्वपूर्ण

तोंडावर आलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा आता महत्वपूर्ण मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.शरद पवार हे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचतील. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे. तसेच, याने पक्षालाही बळकटी मिळणार अस चित्र निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीने कसा अन्याय केला

तर दुसरीकडे भाजप पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत एक ठराव मांडण्यात आला. राज्यातील विविध घटकांवर महाविकास आघाडीने कसा अन्याय केला आहे, हे स्पष्ट करणारा राजकीय ठराव मांडण्यात आला. बलात्कार, अंमली पदार्थ, भ्रष्टाचार, व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी पक्षातर्फे राज्यभर सभा घेण्यात येतील. तसेच डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बकरी ईदच्या निमित्ताने उच्च न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय

News Desk

“उद्धवजींचे मन काँग्रेसबाबत तरी मोठे आहे”,अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला

News Desk

गेंड्याच्या कातडीच्या सरकारने केलेली ही हत्याच आहे | धनंजय मुंडे

News Desk