पिंपरी चिंचवड। शरद पवार दोन हे दोन दिवसांच्या पिंपरी चिंचवड दौरा करणार आहेत. राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची शनिवारी बैठक होणार असून रविवारी मेळावा घेण्यात येणार आहे. खुद्द शरद पवार यांच्याकडून पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी शहरात लक्ष घातल्याचे दिसत आहे. येत्या शनिवारी आणि रविवारी शरद पवार दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत. शनिवारी आजी-माजी नगरसेवकांची बैठक, तर रविवारी कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
कसा असेल पवारांचा दौरा
शनिवारी दुपारी साडेतीन वाजता आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयात सरकारी योजनेचा नागरिकांना लाभ देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करणार आहेत.त्यानंतर निगडी, यमुनानगर येथील बॅक्वेट हॉल येथे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर, रविवारी दुपारी साडेतीन वाजता रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे हे उपस्थित असणार आहेत.
‘भाजपला वायद्यांची आठवण करुन देणार’
“भाजपच्या वायद्यांची आठवण करुन देणाऱ्या प्रश्नमालिकेविषयी माहिती देताना जगताप म्हणाले, ‘पुणे महापालिकेत पुणेकरांनी भाजपला ऐतिहासिक बहुमत दिले होते. मात्र या बहुमताचा वापर पुण्याच्या विकासासाठी करणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र भाजपचे वायदे म्हणजे ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात…’ या म्हणीप्रमाणे ठरले आहेत. भाजपच्या या ‘मुंगिरीलाल’च्या स्वप्नांनी जाणीव पुणेकरांना करुन देणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तव्य आहे”, असं प्रशांत जगताप म्हणाले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.