मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात मोठे विधान केले आहे. निवडणुकांसदर्भात आमच्याच पक्षात दोन मतप्रवाह असल्याचे शरद पवारांनी आज (१० मे) कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले. शरद पवार म्हणाले, “निवडणुकीसंदर्भात आमच्याच पक्षात दोन मतप्रवाह आहेत. यातील एका गट वाटतेकी, प्रत्येकाने आपल्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवावी. आणि निवडणुकीनंतर एकत्र यावे. तर दुसऱ्या गटाला वाटते की, जर राज्यात सरकार एकत्र चालवितो तर निवडणूक देखील एकत्र लढवावी. कारण हे सरकारसाठी चांगले राहिल. परंतु, यासंदर्भात आमचा निर्णय झालेला नाही.”
शरद पवार म्हणाले, “न्यायालयाने म्हटले, ज्या निवडणूक थांबवल्या होत्या. ज्या टप्प्यात निवडणुका थांबल्या होत्या. येथून सुरू करा. काही ठिकाणी निवडणुकीसाठी हरकती मागवायच्या आहेत. हरकती मागितल्यानंतर एक महिना जातो. यानंतर वॉर्डरचना करण्यात येते आणि यानंतर मागासवर्गीयांसाठी राखीव वॉर्ड रचनेसाठी एक महिना तर जातोच. यामुळे निवडणुकांसाठी घेण्यासाठी अडीच ते तीन महिने तर लागणारच आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला १५ दिवसात निवडणूक घ्या, असे म्हटले नाही. परंतु, निवडणूक तयारीची प्रक्रिया १५ दिवसांत प्रक्रिया सुरू करा,” असा आदेश दिले आहे.
अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही
अयोध्या दौरा हा काही राष्ट्रीय प्रश्न नाही. तर सध्या देशात महागाई, बेरोजगारी आणि पेट्रोल-डिझेलचे वाढत्या किंमती साराखे प्रश्न देशाला भेडसावत आहेत. परंतु, सध्या धार्मिक मुद्दे पुढे रेटले जात आहेत. अयोध्या दौरा काय माझा नातूही काल मी पाहिले तर अयोध्येला गेला होता. यात विशेष असे काही नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर अनेक गैरसमज झाला असून १५ दिवसात निवडणुक घ्या, असे न्यायालयाने म्हटले नाही तर १५ दिवसांत निवडणुकीच्या तयारीला लागा, असे म्हटले
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.