HW News Marathi
महाराष्ट्र

दिल्लीत शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट

नवी दिल्ली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज ( ४ नोव्हेंबर) काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहे. राज्यात सध्या सत्ता स्थापनेवरुन शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी ही विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे ते आता हा निर्णय बदलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींची भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेस वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादी ही विरोधी पक्षातच राहणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. मात्र, त्यानंतर आता शरद पवार हे सोनिया गांधी यांची भेट घेणार आहे. या भेटी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

मुख्यमंत्री आज घेणार शहांची भेट

तसेच दुसऱ्या बाजुला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. भाजपकडून ही भेट राज्यात अवकाळी पावसामुळे ओला दुष्काळ सदृश्य स्थिती आणि राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत उभारणार ‘मुंबई आय’

swarit

समृद्धी महामार्गाची सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेंची इलेक्ट्रिक कार मधून पाहणी

Aprna

कोकण ते विदर्भातील जिल्ह्यांना यलो ॲलर्टक …पावसाचं कमबॅक ?

News Desk