HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीत गेलेले पारनेरचे शिवसेनेचे नगरसेवक स्वगृही परतले !

मुंबई | पारनेर प्रकरणावरून निर्माण झालेला महाविकास आघाडीतला तिढा अखेर मिटला आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले ५ नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परत पाठवले आहेत.

सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटायला मातोश्री वर भेटायला गेले आहेत.आज अजितदादांनी मंत्रालयात बोलावून घेतले आणि आमदार लंके यांच्या उपस्थितीत ते पाच नगरसेवक हजर झाले.

राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना राष्ट्रवादीत फोडाफोडीचे राजकारण पाहायला मिळत होते. खरंतर राज्यात एकत्र सत्ता स्थापन करण्यापूर्वीच पारनेरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची नगरपंचायतीवर एकत्र सत्ता आली होती. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी चक्क पक्षाला रामराम ठोकत आज (४ जुलै) राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. दरम्यान, राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत

पारनेर शिवसेनेच्या या ५ नगरसेवकांनी दुपारी बारामतीला जाऊन राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला . त्यांच्यासोबत अन्य काही पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ५ नगरसेवकांच्या या राष्ट्रवादी प्रवेशाने आता निश्चितच पारनेर शहरात राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांचे बळ वाढले आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांना मात्र मोठा फटका बसला आहे. पुढच्या महिन्यात असलेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी निश्चितच हा धक्का लागला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण

Aprna

पूरग्रस्त भागात दररोज 15,000 थाळ्या पुरवणार मास्टरशेफ संजीव कपूर!

News Desk

Live Update : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

News Desk