HW News Marathi
महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनानंतर राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांची वेगवेगळी भूमिका

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३ एप्रिल) भारतीयंना संबोधित केले. २२ मार्चला ताळ्या आणि थाळ्या वाजवून भारतीयांनी जो प्रतिसाद दिला त्याचे अनुकरण इतर देश करत आहेत तसेच त्याबद्दल भारतीयांचे त्यांनी कौतुकही केले. त्यानंतर मोदींनी भारतीयांना ५ एप्रिलला ९ मिनिटे लाईट्स बंद करुन मेणबत्ती, दिवा, टॉर्च लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या या आवाहनावर राजकीय स्तरातून आणि नेटकऱ्यांकडूनही टीका येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ‘भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका,’ अशा शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप व्यक्त केला.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते रोहित केला. तर दुसरीकडे राोनाची लनी दिली.पवार यांनी त्यांच्या या आवाहनाचे स्वागत केले आहे. दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा हेतू असावा. तसे असेल तर त्याचे स्वागतच करायला हवे,’असे रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे. दरम्यान, या सगळ्यात राष्ट्रवादीच्या २ नेत्यांच्या मतामध्ये वेगवेगळ्या भूमिका दिसून आल्या आहेत. तसेच, ‘आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही राष्ट्रध्वजाचा डीपी ठेवत एकतेचा संदेश घट्ट करण्याचे आवाहन रोहित पवार यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पीय अधिवेशन हीच शेतकरी कर्जमाफीसाठी योग्य वेळ – विखे पाटील

News Desk

विकास फक्त शरद पवारांच्या होम पिचवर होतोय, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर!

News Desk

राज्यात दिवसभरात ८ हजार ६०२ नवे कोरोनाबाधित रुग्ण, १७० रुग्णांचा मृत्यू!

News Desk